Download All Shree Lipi Fonts FREE

Ganesh Chaturthi (आतुरता आगमनाची) Banner Editing

Ganesh chaturthi Banner Editing festival Banner Editing

 

 नमस्कार मित्रांनो,

आज या ठिकाणी मी तुम्हाला गणेश चतुर्थी सना निमित्त, वर दाखवल्याप्रमाणे आतुरता बाप्पाच्या आगमनाची बॅनर कश्या प्रकारे बनऊ शकता हे सांगणार आहे. त्यामुळे शक्य झाल्यास सदर आर्टिकल काळजीपूर्वक आणि संपूर्ण वाचा...,

वरती दाखवल्याप्रमाणे जो बॅनर मी बनवला आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील बनवू शकता. त्यासाठी लागणारे सर्व मटेरियल मी तुम्हाला या आर्टिकल मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ते डाऊनलोड करून खूप सहज रित्या तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने बॅनर एडिटिंग करू शकता.

जर तुम्ही माझे आर्टिकल खूप आधी पासून वाचत असाल तर तुम्हाला जाणवेल की मागच्या वेळी ज्या बॅकग्राऊंड चा वापर आपण केला होता त्याचं बॅकग्राऊंड चा वापर आज आपण य ठिकाणी करणार आहोत. त्याचप्रमाणे बाकी काही मटेरियल चा देखील यात वापर करण्यात आला आहे.  महत्वाचे म्हणजे या साठी आपण ज्या इफेक्ट्स चा वापर केला आहे ते तुम्हाला समाजाने गरजेचे आहे, जर ते तुम्हाला कसे वापरायचे कळल्यास तुम्ही कोणत्याही बॅनर साठी अश्या प्रकारचे इफेक्ट्स वापरून आकर्षक व उत्तम प्रकारे बॅनर एडिटिंग करू शकता. या बॅनर मध्ये आपण स्पेशल अश्या हाताने लिहिलेल्या कॅलिग्राफी चा वापर केला आहे, आणि मला खात्री आहे तुम्हाला ती नक्की आवडेल. पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की सर्व मटेरियल ची लिंक खाली दिलेली आहे तेथून तुम्ही अगदी सहज रित्या डाऊनलोड करू शकता.

Download Material

वरील बॅनर साठी मी ज्या पायऱ्यांचा वापर केला त्या खालील प्रमाणे:

 • सगळ्यात आधी बॅकग्राऊंड सिलेक्ट करावा व त्याला blur इफेक्ट द्यावा (8)
 • त्यानंतर आपण श्रीगणेशाच्या फोटोला बॅकग्राऊंड वर आणणार आहोत. त्या फोटोला तुम्हाला हव्या त्या पोझिशन मध्ये ठेवत त्याचा खालचा भाग erase करायचा आहे. त्यानंतर adjust tool मध्ये जाऊन त्याची value -100% करायची आहे. जेणेकरून गणेशाचा फोटो black and white होईल.
 • आपण जो बॅकग्राऊंड ब्लर केला होता तो नवीन लेयर वर आणायचा आहे. त्याचा खालचा भाग क्रॉप करून किंवा नाही केला तरी चालेल. त्या बॅकग्राऊंड ला Overlay Blending इफेक्ट द्यायचा आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या Layer वरील काही भाग erase करू शकता.
 • नवीन leyar वर श्री गणेशाचा दुसरा फोटो आणायचा आहे, त्यालाही तुमच्या गरजेनुसार adjust करायचं आहे. व सर्व डिझाईन सेव्ह करायचं आहे.
 • त्यानंतर इफेक्ट टूल मध्ये जाऊन जे इफेक्ट आपण वापरणार आहोत ते खालील प्रमाणे :
 1. Noise Effect
 2. BRL
 3. Light Cross
 4. Dodger

वरील इफेक्ट्स कश्या प्रकारे द्यावेत हे सर्व मध्ये आपल्या युट्यूब चॅनल वर दाखवले आहे कृपया तो व्हिडिओ पूर्ण पहावा ही विनंती.

 • सर्व इफेक्ट्स योग्य प्रकारे करून झाल्यास तयार झालेले डिझाईन सेव्ह करून घ्यावे.
 • ब्रश PNG ची Adjustment कश्या प्रकारे करावी हे तुमच्यावर depend आहे.                                        
 • सर्व झाल्यास तुम्ही पुढील डिझायनिंग ला सुरुवात करू शकता...
I hope above steps well help you.
If you Never Understood Above Steps Then Please Watch Our YouTube Tutorial Below.

Thank you 😊.